तिळवणी - आज दिनांक एक जानेवारी रोजी तिळवणी येथील सद्गुरू संत गाडगेबाबा महाराज सार्वजनिक वाचनालय यांचे वतीने ग्रंथालयात वाचन पंधरवडा कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी चे अशोक राहाणे सर यांनी काम पाहिले याप्रसंगी वाचनाचे महत्त्व तसेच पुस्तकांचे जीवनातील महत्त्व काय असते याविषयी श्री लक्ष्मण पंडोरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकांची संगत धरावी लागेल जो पुस्तकांच्या संगतीत राहतो तो आयुष्यात यशस्वी होतो असे सांगून वाचनालया चा वापर करून उच्च पदावर गेलेल्या मान्यवरांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन सादर केले वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू वाघ यांनी एक जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत जो वाचन पंधरवडा साजरा केला जात आहे त्याविषयी माहिती दिली तसेच या पंधरा दिवसात कोणकोणते कार्यक्रम राबवायचे आहे त्याची माहिती दिली आणि संपूर्ण उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्यांचे योगदान लक्षात घेऊन बक्षिसांची घोषणाही करण्यात आली निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा चित्र वाचन स्पर्धा तसेच प्रसंग कथन व संवाद कथन स्पर्धा यामध्ये विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर बक्षीस जाहीर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण पंडोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री तळपे सर यांनी केले . यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तकाचे प्रदर्शन लावलेले होते त्यापैकी आवडीच्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले तसेच घरी वाचण्यासाठी ही पुस्तके घेतली या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका आशाताई वाघ , ग्रंथपाल सहाय्यक श्री.अनिल शेळके, वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू वाघ श्री अमोल शिंदे हे उपस्थित होते मुलांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली