संजीवनी मत्स्य संघाचे माध्यमांतुन वर्षभरात सत्तर लाख मत्स्यबीज निर्माती करणार-विवेकभैय्या कोल्हे. - Shramik News

Breaking

Thursday, January 2, 2025

संजीवनी मत्स्य संघाचे माध्यमांतुन वर्षभरात सत्तर लाख मत्स्यबीज निर्माती करणार-विवेकभैय्या कोल्हे.


 


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दि. २ जानेवारी २०२५

कोपरगांव -  शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी शेततळयातील मस्त्य शेती संवर्धनाचे संपुर्ण मार्गदर्शन एकाच छताखाली मिळावे याउददेशांने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न साकारण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली संजीवनी फोरम व संजीवनी मत्स्य संघाचे माध्यमातुन वर्षभरात सत्तर लाख मत्स्यबीज निर्मीती करणार असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी केले. 

           तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशिल शेतकरी प्रकाश बारहाते यांच्या शेततळयात संजीवनी फोरमच्या सहकार्याने शेतीला जोडधंदा म्हणुन अकरा महिन्यापुर्वी सोडण्यांत आलेल्या बीज संवर्धनातुन तयार झालेल्या मासे उत्पन्नाची खरेदी व विक्रीचा शुभारंभ गुरूवारी करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

           प्रारंभी संजीवनी ग्रुप हेड संजीव पवार यांनी मत्स्य शेती संवर्धनातुन शेतक-यांना कशा प्रकारे उत्पन्न मिळु शकते त्याबाबतचे संपुर्ण मार्गदर्शन करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शेतीपुरक विविध उपक्रम हाती घेतले असुन शेतक-यांनी संपर्क साधुन मत्स्य शेतीबरोबरच अन्य उपक्रम राबविण्यासाठी कारखान्याशी संपर्क करावा असे आवाहन केले.      याप्रसंगी महाराष्ट्र बँक दहेगांव बोलका शाखेचे व्यवस्थापक हितेश कुशारे यांनी शेती कर्जाबाबात केंद्र व राज्य शासनांच्या योजनांची माहिती दिली. संजीवनी मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष विष्णुपंत क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.



           श्री. विवेक भैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, शेती व्यवसायावर दिवसेंदिवस नैसर्गीक आसमानी सुलतानी संकटे येत आहेत त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान होत आहे, शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायातुन शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी संजीवनी फोरमची स्थापना करण्यांत आली असुन जिल्हयात सर्वप्रथम संजीवनी मत्स्य संघाची नोंदणी करून त्यातुन मत्स्य शेती संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. गेल्या अकरा महिन्यात कोपरगांव विधानसभा मतदार संघात ६० शेततळयात मत्स्य शेती उपक्रम हाती घेवुन त्याबाबतचे शास्त्रोक्त मार्गदर्शन एकाच छताखाली देवुन त्यातुन उत्पादीत होणा-या माशांची खरेदी-विक्री या संघाच्या माध्यमांतुन केली जाणार आहे तेंव्हा जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.



             याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृताताई वसंतराव पवार, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक सर्वश्री. त्रंबकराव सरोदे, ज्ञानेश्वर औताडे सर, रमेश आभाळे, शिवाजीराव बारहाते, पांडुरंगशास्त्री शिंदे, बापूसाहेब बारहाते, निवृत्ती बनकर, विलासराव माळी, डॉ. गुलाबराव वरकड, केशवराव भवर, प्रकाश सांगळे, मच्छिंद्र लोणारी, रामभाउ कासार, बाळासाहेब शेटे,फकिरराव बोरनारे, मुकुंद काळे, राजेंद्र परजणे, डॉ. विजय काळे, भिमा संवत्सरकर, यादवराव संवत्सरकर, रविंद्र आगवण, रविंद्र पोळ, किशोर परजणे,संदीप देवकर,अतुल सुराळकर,राजेंद्र लोखंडे, वसंतराव पवार सुश्रुत फाउंडेशन नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरसाठ यांच्यासह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पांडुरंगशास्त्री शिंदे यांनी आभार मानले. 



Pages