जिल्हा परिषद प्राथमिक बनकर वस्ती शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा - Shramik News

Breaking

Friday, January 3, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक बनकर वस्ती शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका 

 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती ब्राह्मणगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनी स्वरा सोनवणे, अमृता मोरे, आरोही सांगळे, अर्पिता केकान, कोमल पवार यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा केली होती. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच सौ शोभाताई बाळासाहेब बनकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ वैशालीताई मोरे या होत्या त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित भाषणे केली शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाकचौरे तसेच महेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राची माहिती दिली आरोही सांगळे व  तेजस बनकर या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंचा जीवनपट आपल्या भाषणामधून उलगडला शाळेच्या वतीने उपस्थित महिला भगिनींचा तसेच शाळेतील स्त्रीशिक्षिका मनीषा जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर  वाकचौरे यांनी केले

Pages