सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ध्वजारोहण उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते संपन्न - Shramik News

Breaking

Tuesday, January 28, 2025

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ध्वजारोहण उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते संपन्न


  श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दि. 26 जानेवारी 2025 

   कोपरगाव - सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ध्वजारोहण उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले.       

यावेळी  संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यावेळी बहारदार ध्वज संचलन केले. , कारखाना परिसरात कलात्मक झेंड्यांची सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे कोपरगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील सार्वजनिक ध्वजारोहण बिपिनदादा कोल्हे तसेच भारतीय जनता पक्ष, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ येथील ध्वजारोहण संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते तर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूर व  संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, झेंडावंदन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका विवेक कोल्हे, प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Pages