भविष्यात पीक पाण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी एस्केप तयार करा - आ.आशुतोष काळे - Shramik News

Breaking

Thursday, February 6, 2025

भविष्यात पीक पाण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी एस्केप तयार करा - आ.आशुतोष काळे


श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 6फेब्रुवारी 2025
 कोपरगाव - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निळवंडे कालव्याच्या पाणी नियोजनासंदर्भात आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघातील लाभक्षेत्रातील सर्व बंधारे व पाझर तलाव भरुन द्या, वडझरी, बोडखे वस्ती, शेख वस्ती व हाडोळा पॉईंट ह्या चारही एस्केपमधून पाणी सोडा तसेच भविष्यात आवश्यक त्या ठिकाणी एस्केपची निर्मिती करा अशा सुचना यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सांडवे उकरण्याची गरज असल्यास आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी निळवंडे पाटबंधारे विभागाचे अभियंता महेशजी गायकवाड, इतर अधिकारी, लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages