रवंदे - पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे या शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सर्व 260 विद्यार्थ्यांचे ब्लड ग्रुप तपासण्यात आले शिबिराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोत,डॉक्टर झवर,डॉक्टर दत्तात्रय आहेर स्वामी समर्थ लॅब चे अभिजीत आहेर, अजिंक्य काळे, विजय मेहरखांब, किरण पवार व शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कदम आदी उपस्थित होते प्रत्येकाला आपला ब्लड ग्रुप माहीत असावा कारण आणीबाणीच्या वेळेस रक्ताची गरज भासल्यास त्याची आवश्यकता लागते त्यामुळे योग्य ब्लड ग्रुप चा पुरवठा केला जातो शरीरासाठी पौष्टिक आहार घेणे फार गरजेचे आहे फास्ट फूड यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला होत असतात त्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत डॉक्टर खोत यांनी व्यक्त केले डॉक्टर झवर यांनी निरोगी आरोग्याच्या काही टिप्स विद्यार्थ्यांना सांगितल्या श्री स्वामी समर्थ क्लिनिकल लॅब च्या वतीने 260 विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप तपासण्यात आला यावेळी श्री स्वामी समर्थ क्लिनिकल लॅबच्या टीमने दिवसभर ब्लड ग्रुप चेकअप चे काम केले ज्या विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे अशा विद्यार्थ्यांचे ब्लड घेऊन चेकअप साठी पाठवण्यात आले या आरोग्य तपासणीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले
Monday, March 24, 2025
